प्रतिवर्षीप्रमाणे प्रशालेत दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना याप्रसंगी शिवप्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढली. याप्रसंगी इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी पोवाडा गायन,शिवचरित्रातील स्फूर्तिदायक प्रसंग कथन करणे, शिवरायांवरील काव्ये गायन करणे,कथाकथन इ. कार्यक्रम सादर केले.शिवचरित्रावरील उत्तम देखावा हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. उत्तम रंगावली, फलक लेखन व भगव्या फेट्यांसह विद्यार्थिनींनी केलेली वेशभूषा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. इयत्ता नववीचे दोन्ही वर्गशिक्षक व इतिहास विभागाच्या मदतीने हा सोहळा उत्साहवर्धक ठरला.

