सैनिकी प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा…

आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शिक्षक दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी परिपाठात आयोजित करण्यात आला. छात्रशाळे अंतर्गत कॅडेट श्रावणी गायकवाड ही आज प्राचार्य तर कॅडेट कादंबरी साळुंखे ही कमांडंट बनली होती.

सर्वप्रथम शिक्षक दिनाचे औचित्य, त्याचे महत्त्व कॅडेट प्रतीक्षा सलामपूरे हिने विषद केले, नंतर कॅडेट सिद्धी वाडेकर हिने सैनिकी प्रशाला म्हणजे जणू एक गुरुकुल असून तिथला प्रत्येक घटक हा शिक्षका इतकाच महत्त्वाचा आहे हे सांगितले. सर्व शिक्षक, मेट्रन्स यांना विद्यार्थिनींनी या निमित्ताने बुक मार्क्स दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट स्वराली ठेलकर हिने केले पार्मिता हडोळतीकर, कॅडेट श्रद्धा राजुरकर, कॅडेट ऋतुजा देवकाते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वाचा हातभार लावला.

Scroll to Top
Skip to content