सैनिकी प्रशालेत सामाजिक बांधिलकी उपक्रम ‘ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर’…

मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार अंबोली पुणे येथे रोटरी क्लब गांधीनगर पुणे यांच्यातर्फे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 संपन्न झाले. प्रशालेच्या वसतिगृह विभागातील मेडिकल रूम येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. रोटरी क्लब गांधीनगर पुणे यांच्या मा. सौ. अश्विनी शिलेदार प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब गांधीनगर पुणे, सौ. संगीता जोशी समन्वयक या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सध्याच्या काळात महिलांच्या आरोग्यविषयक अनेक समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. बऱ्याच वेळा महिलांचे याकडे दुर्लक्ष होते व काही महिला याविषयी मोकळेपणाने बोलायला, तपासणी करायला घाबरतात. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रशालेने रोटरी क्लबच्या मदतीने या शिबिराचे आयोजन केले. प्रशालेतील तसेच कासार अंबोली गावातील महिलांना ब्रेस्ट कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक महिलेची तज्ञ डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी देखील करण्यात आली. कासार आंबोली गावातील तसेच सैनिकी परिवारातील एकूण 110 महिलांची तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम, वसतीगृह विभाग प्रमुख सौ. रेखा रायपूरकर, सौ वैशाली शिंदे, इस्टेट सुपरवायजर श्री. समीर जाधव, मेस मॅनेजर श्री. नवनाथ पवार व मेट्रन इन्चार्ज श्रीमती प्रियांका गुरव उपस्थित होत्या. प्रशालेतील महिला शिक्षिका, मेस मधील सर्व महिला कामगार, साफसफाई करणाऱ्या महिला कामगार, सैनिकी परिवारातील सर्व महिला, कासार आंबोली गावातील महिला, हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथील महिला शिक्षिका यांनी शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत संपन्न झाले.
प्रशालेचे कमांडर विंग कमांडर यज्ञरमण सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री संदीप पवार व प्रशालेतील सर्व वसतिगृह विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर संपन्न झाले.

Scroll to Top
Skip to content