स्वरवेध लोकगीत गायन स्पर्धा…

म. ए. सो. कलावर्धिनी आयोजित स्वरवेध लोकगीत गायन स्पर्धेत आपल्या प्रशालेच्या भारुड संघाला प्रथम पारितोषिक मिळाले.
ही स्पर्धा लोकगीतातील कीर्तन, भारुड, पोवाडा व गोंधळ या प्रकारांची होती आपल्या प्रशालेतील एकूण 44 कॅडेटस या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा तीन गटांमध्ये झाली. यातील दोन गटांमध्ये आपल्या प्रशालेतील कॅडेट्स सहभागी झाल्या होत्या. गट क्रमांक 2- इ. 5 वी ते इ. 7 वी च्या गटांमध्ये आपले 2 संघ गवळण आणि पोवाडा या प्रकारात सहभागी झाले होते. पोवाडा संघाला श्री. भाऊसाहेब मार्तंड व गवळण संघाला श्री. मंगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच गट क्रमांक 3
इ. 8 वी, इ. 9 वी व इ. 11 वी च्या गटामध्ये आपले दोन संघ गोंधळ व भारुड या प्रकारात सहभागी झाले होते. गोंधळ संघाला सौ. दिपाली भावसार व भारुड संघाला श्रीमती प्रियांका राजहंस यांनी मार्गदर्शन केले होते. गट क्रमांक 3 यामध्ये 21 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आपल्या प्रशालेच्या भारुड संघाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. आपल्या कॅडेटस ने सर्व रंगमंचावर सर्व साहित्यानिशी आणि योग्य वेशभूषे सह अत्यंत उत्तम आणि चित्तवेधक असे सादरीकरण केले. या स्पर्धेचे परीक्षण मा. श्री संतोष मोरे व मा. श्री शाहीर हेमंत राजे मावळे यांनी केले. या स्पर्धेच्या सर्व कॅडेट्सना मार्गदर्शन हे आपल्या प्रशालेतील छंद वर्गामध्ये मिळाले. छंद वर्गामध्ये श्री. अद्वैत जगधने, तबल्यासाठी श्री. प्रसाद कन्नाव व गायन व पेटी यासाठी पूजा वाणी यांचे मार्गदर्शन मिळाले. सुरुवातीपासून प्रशालेचे कमांडंट मा. एअर विंग कमांडर म. यज्ञरामन् आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, सिनियर मास्टर श्री. संदीप पवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी खूप प्रोत्साहन दिले.
सर्व सहभागी कॅडेट्सचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन…

Scroll to Top
Skip to content