१७ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – शतकोत्तर हीरकमहोत्सव वर्षपूर्ती समारंभ प्रशालेमध्ये साजरा….

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ( सन १८६०- २०२०) मा. श्री. नितीन गडकरी जी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म – लघु – मध्यम उद्योग मंत्री यांचे आज मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी आँनलाईन व्याख्यान झाले या कार्यक्रमासाठी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या गोडबोले सभागृहात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, एकूण  २१ उपस्थिती होती. तर मा. प्राचार्यांच्या पूर्वपरवानगीने बाहेरगावी असणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आँनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला, या  निमित्ताने मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top
Skip to content